हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सत्र न्यायालयाने काँग्रेसच्या माजी आमदाराला म्हणजेच सुनील केदार यांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना पाच वर्षांचा कारावास आणि 12.50 लाख दंड ठोठावला आहे. आता या सर्व प्रकरणा नंतर सुनील केदार यांना एक दुसरा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील केदार यांची आमदारकी रद्द केली आहे. ज्यामुळे आता केदारी यांच्या हातातून आमदारकीचे पद देखील गेले आहे.
नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्यानंतर न्यायालयाचा आदेश नागपूर पोलिसांनी विधीमंडळात पाठवला होता. त्यामुळे सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांच्या हातामध्ये आला होता. अखेर आज नार्वेकर यांनी सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा मोठा फटका सुनील केदार आणि काँग्रेस पक्षाला बसला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे नेते सुनील केदारे यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला या प्रकरणात एकूण सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. परंतु यातील तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत. तसेच मुख्य आरोपी असलेल्या सुनील केदारी यांना पाच वर्षाची कारावासाची शिक्षा आणि लाखोंचा दंड भरण्यास सांगितला आहे.