राजीनामा देऊन डॅशिंग पोलीस कर्मचारी सुनिता बनणार आहे आयपीएस 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संचारबंदीच्या काळात वडिलांची गाडी घेऊन नियमांचे उल्लंघन केलेल्या आमदाराच्या मुलाला दम भरणाऱ्या पोलीस कर्मचारी सुनिता यादव या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. संचारबंदीच्या काळात मंत्र्याच्या मुलाला आणि खुद्द आरोग्यमंत्र्यांना सुनावणाऱ्या पोलीस एल.आर सुनिता यादव यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र ब्रम्हभट यांची भेट घेतली. त्यांनी आयुक्तांना मी माझे कर्तव्य बजावत होते. मी काही चुकीचे केले नसल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी राजीनामा देऊन आयपीएस अधिकारी पदासाठी अभ्यास करणार असल्याचे सांगितले आहे.

आयपीएस अधिकारी बनण्याची इच्छा असून मी त्याचा अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ब्रम्हभट यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर जर काही तक्रार नोंदवायची असेल तर लिखित स्वरूपात द्यावी असेही त्यांनी यादव यांना सुचविले आहे. मात्र सुनिता यांच्या राजीनाम्याबद्दल अद्याप लिखित स्वरूपात काहीही मिळाले नसल्याची माहिती त्यांनी दिली. गुजरातच्या वरछा येथील राज्य आरोग्य मंत्री कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश कनानी संचारबंदीच्या काळात वडिलांची नेमप्लेट असलेली गाडी घेऊन नियमांचे उल्लंघन करत असताना त्याला यादव यांनी दम दिला होता.

सुनिता यांनी अडवल्यानंतर प्रकाश कनानी यांनी त्यांना ३६५ दिवस इथेच उभे करण्याची ताकद ठेवतो अशी धमकी दिली होती. यावर सुनिता यांनी मी तुमच्या वडिलांची गुलामी करीत नाही. आणि आणि वर्दी तुझ्या वडिलांची गुलामगिरी करण्यासाठी नाही चढविली. असा दम भरला होता. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. सुनिता यांना काही दिवस सक्तीच्या  रजेवरही पाठविण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment