महाविकास आघाडीत पुन्हा वाद? यंदा काँग्रेस ‘या’ कारणावरुन नाराज

मुंबई । महाजॉब्स हि योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे कि फक्त राष्ट्रवादी , शिवसेनेची ? हा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे युवा नेते आणि प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विट केले आहे. महाआघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून आहे. परंतु त्यावर वर्चस्व हे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे आहे.त्यामुळे काँग्रेस नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील कोणताही तणाव नाही, बिघाड नाही, असा दावा तिन्ही पक्षातील नेते करत असले तरी कुरबुरी सातत्याने समोर येत आहेत. आता युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरुन प्रश्न उपस्थित केला आहे.काही दिवसांपूर्वी काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली होती. र्चेदरम्यान ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या गोष्टींचे पालन राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून होत नाही. तसेच अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्यांना डावललं जात आहे . त्यामुळे नाराजी वाढत असल्याची चर्चा होत आहे. महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? असा सवाल सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी फोटो शेअर करुन ट्वीट केलं आहे.

या ट्विट सोबत त्यांनी एक फोटो जोडला आहे. त्यात मुख्यामंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील , कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री अदिती तटकरे उपस्थित असलेला फोटो शेअर केला आहे.परंतु त्यामध्ये काँग्रेस च्या एकाही नेत्याचा फोटो नाही. यावरून काँग्रेस मध्ये नाराजीचे सूर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महाजॉब्स’ पोर्टलचं’च उद्धघाटन ६ जुलै रोजी झालं होत. राज्यातल्या उद्योगात गरीब मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात हा उद्देश हे पोर्टल सुरु करण्यामागचा आहे. कंपन्यांना कुठले कामगार हवे आहेत याची माहिती या पोर्टलवर असणार आहे.
ट्वीटमध्ये सत्यजीत तांबे यांनी लिहिलं आहे की, ” महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की फक्त शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला आहे.”

अलीकडे राज्य सरकारने सुरु केलेल्या बेरोजगार तरुणांसाठी महाजॉब्स हे पोर्टल सुरु केलं आहे.हे पोर्टल म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. महाराष्ट्रातील तरुणांना पारदर्शक पणे रोजगार मिळाले जावेत आणि लवकरात लवकर या पोर्टल चे अँप मध्ये रूपांतर करावे अश्या सूचना मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आता महाजॉबच्या रुपाने औद्योगिक रोजगार ब्युरो म्हणून कंपन्या आणि कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांमधील दुवा महाराष्ट्र शासनाने निर्माण केला आहे. जिथे महाराष्ट्रातील सर्व कुशल अर्धकुशल व अकुशल कामगारांना सतरा अनेक क्षेत्रात ९५० अधिक व्यवसायामध्ये रोजगाराची एक अतिशय मोठी संधी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.