सिनेअभिनेते सनी देवोल यांचा भाजपमध्ये प्रवेश

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  बॉलीवूड अभिनेते सनी देवोल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते त्यांनी  भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर सनी देवोल भाजपच्या तिकिटावर हरयाणा मधून निवडणूक लढवण्याची देखील शक्यता आहे.

माझे वडील अटल बिहारी वाजपेयी यांचे समर्थन करत होते. आता मी मोदीजींचे समर्थन करणार आहे. तसेच राजकारणात प्रवेश केल्यानंतरचे माझे काम बोलके असणार आहे अशी प्रतिक्रिया  सनी देवोल यांनी भाजप प्रवेशानंतर दिली आहे.

 

सनी देवल यांची सिने कारकीर्द 

सनी देवोल यांनी १९८३ साली बेताब या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.  चित्रपटाच्या क्षेत्रात पहिलाच चित्रपट त्यांना मोठी सफलता देवून गेला. त्यानंतर त्यांनी सोनी महिवाल , निगाहें या सारखे प्रेमकहाणीचे चित्रपट काढले. तर त्यांचा दामिनी हा सामाजिक  आशयावर आधारित चित्रपट लोकांच्या मोठ्या पसंतीला उतरला. वर्दी ,दामिनी , इज्जत कि रोटी , घातक असे सामाजिक आशयाचे चित्रपट काढले. तर त्यांनी देशभक्तीपर चित्रपट काढून मनोरंजन क्षेत्राचा सामाजिक उत्तरदायित्व देखील पार पडले आहे.

२००२ साली चित्रित  झालेल्या शहीद चित्रपटात साकारलेले चंद्रशेखर आझाद यांचे पात्र , इंडियन चित्रपटातील विरिष्ठ पोलीस अधिकऱ्याची भूमिका ,  मा तुझे सलाम मधील मेजर प्रताप सिंह यांची भूमिका या देशभक्तीने भरवलेल्या चित्रपटातून सनी लोकांच्या मनात रियल हिरो बनून गेला.  

सनी देवोल यांनी भूमिका साकारलेले चित्रपट

1990 आग का गोला, 1990 घायल अजय मेहरा , 1990 क्रोध, 1990 वर्दी, 1989 चालबाज़ ,1989 निगाहें 1989 जोशीले, 1989 त्रिदेव ,1989 मैं तेरा दुश्मन, 1989 मज़बूर, 1988 यतीम,  1988 पाप की दुनिया,  1988 इन्तकाम,
1988 राम अवतार,  1987 डकैत, 1986 सवेरे वाली गाड़ी , 1986 समुन्दर ,1986 सल्तनत ,1985 अर्जुन ,1985 ज़बरदस्त , 1984 सोनी महिवाल ,1984 मंज़िल मंज़िल , 1984 सनी , 1983 बेताब, 2018 मोहल्ला अस्सी ,2017 पोस्टर बॉईज , 2016 घायल वन्स अगैन , 2013 यमला पगला दीवाना-2 , 2011 यमला पगला दीवाना , 2010 राईट या राँग , 2007 बिग ब्रदर , 2007 अपने अंगद चौधरी , 2007 फूल एन फाइनल मुन्ना , 2006 तीसरी आँख , 2006 नकशा , 2006 काफ़िला , 2005 जो बोले सो निहाल , 2004 रोक सको तो रोक लो , 2004 लकीर , 2003 द हीरो
2003 कैसे कहूँ कि प्यार है , 2003 खेल , 2003 जाल , 2002 माँ तुझे सलाम , 2002 कर्ज़ , 2002 २३ मार्च १९३१ शहीद , 2002 जानी दुश्मन , 2001 फ़र्ज़ , 2001 ग़दर , 2001 कसम , 2001 ये रास्ते हैं प्यार के , 2001 इण्डियन 2000 चैम्पियन , 1999 प्यार कोई खेल नहीं , 1999 दिल्लगी , 1999 अर्जुन पंडित , 1998 सलाखें , 1998 इसकी टोपी उसके सर , 1997 ज़िद्दी , 1997 ज़ोर , 1997 बॉर्डर 1997 कहर राजा , 1997 और प्यार हो गया , 1996 जीत,1996 अजय , 1996 घातक , 1996 हिम्मत , 1995 अंगरक्षक , 1995 दुश्मनी ,1995 इम्तिहान , 1994 इंसानियत, 1993 गुनाह , 1993 डर , 1993 इज़्ज़त की रोटी , 1993 लुटेरे , 1993 दामिनी , 1993 क्षत्रिय .1992 विश्वात्मा , 1991 नरसिम्हा , 1991 विष्णु देवा , 1991 योद्धा ,  1991 शंकरा