हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २२ मार्च पासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणारी इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2024) ला सुरुवात होत आहे. त्यादृष्टीने सर्वच संघ तयारीला लागले आहेत आणि नवनवीन व्युव्हरचना सुरु झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सनरायजर्स हैद्राबादने (Sunrisers Hyderabad) एक मोठा निर्णय घेतला आहे. हैद्राबादच्या संघाने कर्णधार एडन मार्करामच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स कर्णधारपदी निवड केली आहे.
पॅट कमिन्स (Pat Cummins) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सुद्धा कर्णधार आहे. जलदगती गोलंदाजी करणाऱ्या पॅट कमिन्सने आपल्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत संघाला अजिंक्यपद मिळवून दिले होते. त्यामुळे सनरायजर्स हैद्राबादने त्याची कर्णधारपदी निवड केली आहे. कारण आयपीएलच्या मागच्या हंगामात एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब होती. हैद्राबादने 14 पैकी तब्बल 10 सामने गमावले होते. आणि गुणतालिकेत ते तळाच्या स्थानावर राहिले होते.
#OrangeArmy! Our new skipper Pat Cummins 🧡#IPL2024 pic.twitter.com/ODNY9pdlEf
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 4, 2024
दरम्यान, आयपीएल 2024 च्या लिलावात सनरायजर्स हैदराबादने कमिन्सला पॅट 20.5 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन आपल्या संघात सामील केलं होते. तेव्हाच त्याच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येऊ शकते अशा चर्चा सुरु होत्या. अखेर हैद्राबादने त्याला कर्णधारपद देऊन मोठी खेळी खेळली आहे. ज्याप्रमाणे आपल्या आक्रमक नेतृत्व पद्धतीने पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकवून दिला होता, त्याच पद्धतीने आता तो हैद्राबादला सुद्धा आयपीएल मध्ये अजिंक्यपद मिळवून देईल अशी आशा फ्रेंचायझी आणि सनरायजर्सच्या चाहत्यांना असेल.