हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय द्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. दरम्यान आज ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तो म्हणजे वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणालाही कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना 27 टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. दरम्यान, आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे.
Supreme Court begins hearing of a plea seeking probe into PM Modi's security breach during his visit to Punjab pic.twitter.com/XeXyqcWuwo
— ANI (@ANI) January 7, 2022
वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली आह़े. ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचे नमूद करत या प्रकरणावर शुक्रवारी निर्णय देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार न्यायालयाने आज निर्णय दिला आहे.