नवी दिल्ली | फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण व वायु प्रदुषण रोखण्यासाठी देशभरातील फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
यासाठी कोर्टाने फटाके फोडण्यासंदर्भातील काही वेळा व निकष ठरवून दिले आहेत. आता रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्यास परवानगी राहील. मात्र कमी प्रदूषणकारी फटाक्यांना परवानगी असेल. त्याचबरोबर फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीवर मात्र पूर्णपणे बंदी असेल. ख्रिसमस आणि नविन वर्षारंभच्या रात्री ११.४५ ते १२.१५ पर्यंत परवानगी असेल, असे निर्देश आज कोर्टाने दिले आहेत.