नवी दिल्ली । कोरोना साथीच्या साथीसाठी लढा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने पीएम केअर फंड (PM Cares Fund) ट्रस्टची स्थापना केली गेली आहे. कोरोना विरुद्ध लढा लढण्यासाठी या फंडामध्ये निधी देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांना केलं होत. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सामान्य नागरिकांपासून उद्योगपतींनी सुद्धा निधी दान केला. दरम्यान, पीएम केअर फंड संदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेत पीएम केअर फंडमध्ये जमा केलेले पैसे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी ( NDRF) मध्ये हस्तांतरित करण्याची मागणी केली गेली होती.
सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनने (CPIL) १७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेत पीएम केअर फंडात जमा केलेली रक्कम राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी एनडीआरएफ फंडाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. या जनहित याचिकेचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या शेवटच्या सुनावणीत केंद्र सरकारने या निधीबाबत आपली बाजू मांडली.
While disposing of the petition, Supreme Court said, no need for fresh national disaster relief plan. https://t.co/zp3A1rejHc
— ANI (@ANI) August 18, 2020
सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केंद्र सरकारने सांगितले की, पीएम केअर फंड तयार करण्यावर कोणतेही बंधन नाही. पीएम केअर फंड राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती दरम्यान इतर फंडांवर प्रतिबंध करु शकत नाहीत. लोक या निधीमध्ये स्वेच्छेने देणगी देऊ शकतात. त्यामुळे सर्व पैसे एनडीआरएफकडे वर्ग करण्याची मागणी करणे योग्य नाही. केंद्र सरकारने याप्रकरणी दाखल केलेली याचिका फेटाळण्याची मागणी केली.
जनहित याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर अनेक अनियमिततेचा आरोप केला. प्रशांत भूषण म्हणाले की, कोविड -१९ चा डीएमएनुसार समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय योजना तयार केली पाहिजे. या योजनेत केंद्राने दिलासा देण्यासाठी काही निकष करणे गरजेचे आहे. पीएम केअर फंडाच्या सर्व पावतींचे कॅगद्वारे लेखापरीक्षण केले पाहिजे आणि त्याची माहिती सार्वजनिक असली पाहिजे. पीएम केअर फंड अंतर्गत जमा केलेली रक्कम जाहीर केलेली नसून ती एनडीआरएफ फंडामध्ये हस्तांतरित केली जावी अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या होत्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”