हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळी अतिक्रमण प्रशासनाच्यावतीने नुकतेच हटवण्यात आले. या कारवाईनंतर याला विरोध करण्यात आला. याबाबत विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्याबाबत आज सुनावणी पार पडली असून न्यायालयाने हि याचिका फेटाळून लावली आहे. कबरीजवळील अतिक्रमण हटवण्याची कारवाई योग्यच असल्याचा दावा कोर्टाने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण अनेक वर्षांपासून तसेच होते. प्रशासनाकडून त्यावर कारवाई केली जात नव्हती. मात्र, काही दिवसापूर्वी राज्य सरकारने कबरीजवळील अतिक्रमण हटवले. सरकारने या ठिकाणी असलेल्या 2 धर्मशाळा आणि 19 खोल्या हटवल्या.
या कारवाईच्या विरोधात हजरत मोहम्मद अफझल खान मेमोरियल ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही कारवाई योग्य असल्याचा युक्तिवाद या याचिकेत करण्यात आला होता. तसेच कबरीजवळचे जे बांधकाम पाडण्यात आले. ते पुन्हा बांधले जावे, अशी मागणी केली होती.
राज्य सरकारने चुकीची कारवाई केल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील निजाम पाशा यांनी केला होता. त्यावर त्यासाठी तुम्हाला नव्याने अर्ज दाखल करावा लागेल किंवा उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असे न्यायालयाने सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारच्या वकिलानेही जोरदार युक्तिवाद करत कारवाई कोर्टाच्या आदेशानुसारच झालेली असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे जाणार प्रतापगडावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. 30 नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीच्या वाद सुरू असताना मुख्यमंत्र्यांकडून या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे. त्यांच्या दौऱ्यावेळी पार पडणाऱ्या एका कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.