सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील एका अधिकाऱ्याच्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राभकर घार्गे यांच्यवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना वडुज पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने प्रभाकर घार्गे यांच्याबाबत महत्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने घार्गे यांना जामीन मंजूर केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पडळ येथील खटाव माण साखर कारखान्यातील एका अधिकाऱ्याच्या मारहाण प्रकरणी प्रभाकर घार्गे यांना पोलिसांनी अटक केली होती. घार्गे यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला.
नेमके काय होते प्रकरण –
पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांमध्ये प्रोसेसिंग हेड म्हणून कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याला 10 मार्च 2021 कारखान्यात साखरेची अफरातफर केल्याच्या आरोपावरून मारहाण करण्यात आली होती. यानंतर संबंधित अधिकाऱ्याला 11 मार्चला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी जामिनासाठी सत्र, जिल्हा, उच्च न्यायालयाची दारे ठोठावली. मात्र, जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर आज घार्गे यांना सर्वोच्च न्यालयाने जामीन मंजूर केला.