हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाच्या एका वकीलाने Aamir Khan विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल असे नाव असलेल्या या वकिलाने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत विनीत जिंदाल यांनी म्हंटले की,” या चित्रपटाने लष्कराचा अपमान केला असून हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.” विनीत जिंदाल यांनी Aamir Khan, चित्रपटाचा दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि पॅरामाउंट पिक्चर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे आयपीसीच्या कलम 153, 153A, 298, 505 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
वास्तविक लाल सिंग चड्ढा (Aamir Khan) हा चित्रपटात भारतीय लष्कराविषयी काही भाग चित्रित करण्यात आले आहेत. मात्र यानंतरही या चित्रपटाला सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी जमवता येत नाही आहे. अशातच सोशल मीडियावर या चित्रपटाला boycott करण्याचा ट्रेंड देखील सुरू आहे. समाजाच्या एका वर्गातील लोकं हा चित्रपट रिलीज होण्याआधीपासूनच चित्रपटाला boycott करण्याचा ट्रेंड चालवत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटाबाबत लोकांच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत.
आता रिचा चड्ढा देखील बॉलिवूड सेलिब्रिटींच्या त्या गटात सामील झाली आहे ज्यांनी ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटातील Aamir Khan च्या अभिनयाचे कौतुक केले. चित्रपट पाहिल्यानंतर boycott च्या ट्रेंडमध्ये तिने ट्विटरवर चित्रपटाचा रिव्ह्यू केला आहे.
चित्रपटाबाबत रिचा चढ्ढाने ट्विट करत म्हंटले की, ‘मी ‘लाल सिंग चड्डा’चे चड्ढा म्हणून मनापासून समर्थन करते, हा चित्रपट आपल्याला हसवतो आणि रडवतो. जेव्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांनी कलाकारांना कॅमिओमध्ये पाहिले तेव्हा ते रोमांचित झाले. सगळ्यांनी छान काम केलं आहे. आशुतोष गोवारीकरच्या शब्दांत सांगायचे तर, हे 5 मसालेदार गोलगप्पा !!! भव्य.’ Aamir Khan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.imdb.com/title/tt10028196/
हे पण वाचा :
भारतातील Palm Oil ची आयात घटली तर सोया तेलाची आयात 125 टक्क्यांनी वाढली !!!
PM Awas Yojana चा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवला !!! कोणा-कोणाला करता येईल अर्ज ते पहा
Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले
‘या’ कार्डच्या साहाय्याने Flipkart वर मिळवा 12% पर्यंतचा कॅशबॅक !!!
Paytm कडून ग्राहकांना धक्का !!! आता वॉलेट बॅलन्समधून क्रेडिट कार्डचे बिल भरणे महागले