मुंबई । मराठा आरक्षणावर आज (15 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली. “पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला असून, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी चांगली बाजू मांडली आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला, याचा आनंद असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवर 27 जुलैपासून नियमित सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. या सुनावणीत राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडेल. शासनाच्या वतीने मुकूल रोहतगी व परमजितसिंग पटवालिया युक्तीवाद करणार असून, प्रख्यात वकिल कपिल सिब्बल व रफिक दादा हे मराठा आरक्षणाच्या बाजूने हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडणार आहेत अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली.
#PGMedicalAdmission चे #मराठाआरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला, याचा मनःस्वी आनंद आहे. आरक्षणाच्या विरोधकांनी वारंवार अंतरिम स्थगिती मागितली. परंतु, राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला. सर्वोच्च न्यायालयाचे आभार. pic.twitter.com/ZKs0gylvSH
— Ashok Chavan (@AshokChavanINC) July 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.