हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिंदे (Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) विरुद्ध ठाकरे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केले. शिंदे गटाच्या वकिलांनी आज नबाम रेबिया प्रकरणाचे संदर्भही कोर्टासमोर मांडले. मात्र यादरम्यान, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विचारलेल्या २ प्रश्नांनी शिंदे गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
अपात्रतेची नोटीस मिळताच अविश्वास प्रस्ताव कसा आला? असा थेट सवाल चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या वकिलांना केला. तसंच नोटीस दिल्यावर तुम्हाला अपात्रच करण्यात आलं असतं असं तुम्हाला का वाटतं? विधानसभा उपाध्यक्ष इतरही कारवाई करू शकले असते, असेही चंद्रचूड यांनी म्हंटल. त्यामुळं शिंदे गटाचे टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान, आज दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपला आहे. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. जवळजवळ 3 तास युक्तिवाद झाला त्यानंतर ही सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण ७ जणांच्या घटनापीठाकडे देणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे.