सत्तासंघर्षाची सुनावणी ‘या’ दिवशी होणार; Supreme Court चा महत्वाचा निर्णय

uddhav thackeray eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण चांगलेच तापले असून आज पुन्हा यावर सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने सुनावणीबाबत महत्वाचा निर्णय दिला. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची मागणी ठाकरे गटाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली असून पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून घेण्याचे कोर्टाने सांगितले.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार असल्याने सर्व देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते. दरम्यान, आज सुनावणी सुरू होताच सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांनी येत्या मंगळवारी पुढील सुनावणी घ्यावी असे कोर्टाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणात आणखी काही मुद्दे असल्याने त्यावर सुनावणी करण्यात येणार असल्याचे कोर्टाने सांगितले.

गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकाल प्रलंबित आहे. आता या प्रकरणावर येत्या मंगळवारी म्हणजे 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10. 30 वाजता ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे मंगळवारी या प्रकरणावर नव्याने सुनावणी करण्यात येणार आहे.