पुणे प्रतिनिधी | कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायचीच असा चंग बांधलेल्या भाजपच्या नेत्यांना जनतेने देखील चांगलाच प्रतिसाद दिला आहे. भाजपच्या उमेदवार कांचन राहुल कुल यांना लोकांनी पसंती दाखवल्याने संपूर्ण मतदारसंघाच संमिश्र मतदान झाल्याची चर्चा आहे. त्याच प्रमाणे Supriya Sule सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार असा देखील अंदाज राजकारणाची जाणकार लोक वर्तवत आहेत.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी मतदार पट्टा. या भागात भाजपची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घट्ट विन आहे. या भागातभाजपने चांगलीच तागत पणाला लावली होती. भाजपच्या ताकतीसारखी येथील मतदारांनी देखील भाजपला पसंती दिली आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना दर वर्षी लीड असते. मात्र यावर्षी याच भागत भाजपच्या नेत्यांनी कोरड्या जमिनीवर पाणी आणण्याच्या गोष्टी केल्याने मतदार भाजपच्या बाजूने गेल्याची देखील चर्चा आहे. तर भोर आणि वेल्हा हे दोन तालुके राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे तालुके मात्र या देखील तालुक्यामध्ये भाजपच्या कमळाचाच बोलबाला होता. Supriya Sule
तर इंदापूर मध्ये राष्ट्रवादीच्या बाजूचे वातावरण दिसत होते. मात्र या हि विधानसभा क्षेत्रात भाजपला निदान ७० हजार मते मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दौंड हा कांचन कुल यांचा घराचा मतदारसंघ होता. त्या मतदारसंघात देखील भाजपचाच बोलबाला होता. राहता राहिला बारामतीचा मतदारसंघ इथे मात्र राष्ट्रवादीच्या बाजूने मतदार झुकला असणार आहे. कारण येथील लोक जय पराजयावर जास्त चर्चा करत नाहीत. तर राजकीय जाणकारांनी देखील बारामतीचा मतदार आपल्या पारंपारिक पसंतीकडे झुकेल असे म्हणले आहे.
एकंदरच बारामती लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चांगलेच संमिश्र मतदान केल्याचे राजकीय अभ्यासकांच्या पाहणीतून दिसून आले आहे. बारामतीत नेमके काय होईल या बद्दल उत्कंठा शिगेला पोचली आहे. मात्र २३ मे पर्यत बारामतीचा सस्पेन्स कायम राहणार आहे. Supriya Sule
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
महत्वाच्या बातम्या
माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान
अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा
छगन भुजबळांवर टीका करण्याएवढे तुम्ही मोठे नाही ; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोल
विजयसिंह म्हणातात…माढ्यासह बारामती आणि मावळमध्ये राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागणार
म्हणून सैराटमधील तो कलाकार माढ्यात करू शकला नाही मतदान
माढ्यात झाले ‘एवढे’ टक्के मतदान : वर्तवले जात आहेत उलट सुटल अंदाज
लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद