अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याबद्दल सुप्रिया सुळेंनी दिली दोनच शब्दात प्रतिक्रिया; म्हणाल्या की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील नेते तथा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी
औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवगाळीही केली. त्यानंतर राज्यभरात सत्तार यांच्याविषयी संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून आंदोलने केले जाऊ लागली आहेत. सत्तार यांच्या वक्तव्यावर आता सुप्रिया सुळे यांनी दोनच शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबादच्या सिल्लोड येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मी काहीही बोलणार नाही. आणि या संपुर्ण प्रकरणावर मी बोलणार नाही, असे त्यांनी म्हंटले.

नेमके काय म्हणाले सत्तार?

सिल्लोड येथे अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरले. यावेळी सत्तार म्हणाले, “इतकी भिकार*** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ…”असं उत्तर त्यांनी दिले. सुप्रिया सुळे आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?” असा सवाल सत्तार यांनी केला.

सत्तारांबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?

सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात.