शरद पवारांच्या चिडण्यावर सुप्रिया सुळे म्हणतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या प्रकार बद्दल सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवार यांच्या चिडण्यावर सर्वच मीडियात चर्चा सुरु असतानाच सुप्रिया सुळे यांनी देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवारांना आपण याआधी एवढे चिडलेले कधीच पाहिले नव्हते असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत पवार साहेबांना आम्ही देखील इतके चिडलेले कधी पाहिले नव्हते. परंतु एखाद्या प्रश्नाच उत्तर मला द्यायचं नाही, असे आधीच सांगितले असताना पाच वेळा तोच तोच प्रश्न विचारला गेला. तसेच, एखाद्या प्रश्नच उत्तर द्यायच नसेल तर तितका अधिकार त्यांना आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. नेरूळमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार मेळाव्याला आज उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा कल भाजप-शिवसेनेकडे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेकांनी पक्षांतर केलेले असून, अजून काही नेते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार हे चांगलेच उद्विग्न झाल्याचे काल दिसून आले होते. ‘नेते पक्ष सोडत आहेत, मात्र आता नातेवाईकही दूर जात आहेत’ असा प्रश्न एका पत्रकाराने शरद पवारांना विचारला असता. या प्रश्नावर पवार पत्रकारावरच जाम भडकले. शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषदेतूनच निघून जाण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर पत्रकाराला माफीसुद्धा मागायला लावली होती.

Leave a Comment