बारामती प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची नोंद होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी दिलेले आव्हान हा या मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघाचे मतदान पार पडल्यापासूनच या ठिकाणी उलट सुलट अंदाज वर्तवले जात होते. मात्र आता बारामतीकरांचा नवा अंदाज सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?
सुप्रिया सुळे या ४० हजारांच्या फरकाने विजयी होतील असा अंदाज खुद्द बारामतीकरांनी काढला आहे. याच मताधिक्याच्या आकड्याला अनुसरून बारामती मतदारसंघात निकालाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभेची वाट म्हणावी तितकी सोपी राहिली नाही. कारण ग्रामीण मतदार हा राष्ट्रवादीच्या हक्काचा मतदार सुद्धा भाजपच्या कमळावर मतदान करून आल्याच्या चर्चा आहे. तर शहरी भागात भाजपचाच बोलबाला आहे.
आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका
अशा सर्व परिस्थितीत जुन्या जाणत्या मतदारांनी राष्ट्र्वादीची साथ दिली आहे. त्यांच्या साथीला आणि राष्ट्रवादीच्या संघटित लढाईला किती प्रमाणात यश मिळते आहे हे पाहण्यासारखे राहणार आहे. तूर्तास बारामती मतदारसंघाच्या निकालाची उत्कटता अधिकच वाढत चालली आहे. त्यामुळे २३ मे ची आतुरता सर्वांनाच लागून राहिली आहे.
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड
धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान
सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज