व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘सूर्यनगरी एक्सप्रेस’चे 11 डबे रुळावरून घसरले; 10 प्रवासी जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानच्या पाली येथे सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सूर्यनगरी एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. रजकियावास-बोमदरा सेक्शनच्या दरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसून 10 प्रवाशी जखमी झाले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि इतर उच्च अधिकारी रेल्वेच्या जयपूर मुख्यालयात या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी लवकरच घटनास्थळी पोहचले असून रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर उत्तर-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांच्या मदतीसाठी ०२९१- २६५४९७९(१०७२), ०२९१- २६५४९९३(१०७२), ०२९१- २६२४१२५, ०२९१- २४३१६४६ हे हेल्पलाईन क्रमांकही रेल्वे प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.