हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Suryoday Small Finance Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Suryoday Small Finance Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्स पर्यंत वाढ केली आहे.
6 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Suryoday Small Finance Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 6 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर आता 4 टक्के ते 9.01 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 ते 9.26 टक्के व्याज दिले जाईल.
Suryoday Small Finance Bank च्या एफडीचे नवीन दर
Suryoday Small Finance Bank आता 7 ते 14 दिवसांच्या कालावधीत 4 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के व्याज मिळत आहे. यानंतर 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.50 टक्के, 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीवर 5 टक्के, 6 महिने ते 9 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 5.50 टक्के आणि 9 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीवर 6 टक्के तसेच 1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांपर्यंतच्या FD वर 7% व्याज देत आहे.
त्याच वेळी, बँक आता 1 वर्ष, 6 महिने ते 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर 8.01 टक्के, 2 वर्षे ते 998 दिवसांपर्यंतच्या FD वर 7.51 टक्के, 999 दिवसांच्या एफडीवर 8.01 टक्के, 2 महिने, 27 दिवस ते 3 वर्षाच्या FD वर 7.25%, 3 वर्षे किंवा त्याहून जास्त आणि 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के, 5 वर्षाच्या FD वर 9.01% व्याज देत आहे. तसेच आता बँकेकडून 5 वर्षे ते 10 वर्षांच्या एफडीवर 6.30 टक्के व्याज दिले जात आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.suryodaybank.com/deposits/fixed-deposit/rate-of-interest
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे