मुंबई । गेल्या २ दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती भायखळा तुरुंगात आहे. रियाने दुसऱ्यांदा तिच्या जामिनासाठी अर्ज केला होता. पण दोन्ही वेळा मुंबई न्यायालयाने तिचा जामिन अर्ज फेटाळून लावत तिला तुरुंगात राहण्याचा निर्णय सुनावला. शुक्रवारी सत्र न्यायालयाने रिया, शौविक यांच्यासह सर्व ६ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांना तुरुंगातच रहावं लागणार आहे. एनसीबीने अटक केल्यानंतर न्यायालयाने रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तिला भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तिला आणि शौविकला जामीन मिळावा यासाठी कायदेशीर प्रयत्नही करण्यात आले.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी जामीन अर्जावरील सर्व युक्तीवाद पूर्ण झाले होते. आज शुक्रवारी न्यायालयाने आपला निर्णय सुनावत रियासह शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, झैद विलात्र आणि अब्दुल बासित परिहार यांनाही जामीन मंजूर केला नाही. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. यापूर्वी मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयाने रियाला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर रियाने दुसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला. ज्याचा निर्णय आज होणार आहे.
विशेष न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी गुरुवारी चक्रवर्ती भावंडं व विशेष सरकारी वकील यांचा युक्तिवाद ऐकला. न्यायाधीशांनी या प्रकरणातील अन्य ४ आरोपींच्या जामीन याचिकांवर सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने खटला शुक्रवारपर्यंत तहकूब केला होता. यावर आज सुनावणी करत सर्व आरोपींचा जामीन नाकारण्यात आला. ही याचिका रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दाखल केली होती.
२८ वर्षीय अभिनेत्री निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात रियासह अटक केलेल्या सर्व आरोपींच्या (ड्रग स्मगलर अनुज केशवानी वगळता) जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रियाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तीन दिवसांच्या चौकशीनंतर मंगळवारी अटक केली. शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना गेल्या आठवड्यात एनसीबीने अटक केली होती.
रियाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, तिच्या चौकशी दरम्यात एकही महिला पोलीस अधिकारी नव्हती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार महिलेचे चौकशी ही पक्त महिला अधिकारी किंवा महिला कॉन्स्टेबल असतानाच केली गेली पाहिजे. मात्र रियाच्या बाबतीत असं काही झालं नाही. तसेच जामीन अर्जात रियाने स्पष्ट सांगितलं की, ती निर्दोष असून तिला या प्रकरणात जाणीवपूर्वक गुंतविण्यात आलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.