मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मागच्या वर्षी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला आता एक वर्ष लोटले आहे. सुशांत आपल्यासोबत नसला तरी त्याच्या आठवणी सदैव त्यांच्यासोबत आहेत. सुशांतचे बॉलीवूड बरोबर क्रिकेटशीसुद्धा खास नाते आहे. मोठ्या पडद्यावर त्याचे करियर क्रिकेटपटूच्या भूमिकेपासून सुरु झाले. त्यानंतर त्याने एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका करत सर्वांचे मन जिंकले. सुशांतने चेतन भगत यांच्या ‘ द 3 मिस्टेक ऑफ माय लाईफ’ या पुस्तकावर आधारित ‘काई पो चे या सिनेमात क्रिकेटपटू आणि खेळाडू म्हणून भूमिका केली होती. सुशांतने त्या सिनेमात अलीचा रोल करणाऱ्या दिग्विजय देशमुख याला बॉलिंगची कोचिंग दिली होती. आता तोच दिग्विजय ‘रियल लाईफ’ मध्ये क्रिकेटचे मैदान गाजवत आहे.
मुश्ताक अली स्पर्धेतून पदार्पण
दिग्विजयने 2019 साली सय्यद मुश्तार अली ट्रॉफी स्पर्धेतून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यात त्याने रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने दिग्विजयला आपल्या संघात सामील केले होते. दिग्विजयने 1 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 6 तर 7 टी20 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत.
दिग्वविजयने मागच्या वर्षी सुशांतच्या आठवणी सांगितल्या होत्या. “सुशांत भैय्या सर्वात चांगल्या व्यक्तीपैकी एक होता. त्याने ‘काई पो चे’ मध्ये माझ्या कोचची भूमिका केली होती. तो एक चांगला क्रिकेटर होता. मी त्याला क्रिकेटमध्ये चांगले खेळेन तेव्हा भेट घेणार असल्याचे सांगितलं होते. मुंबई इंडियन्सने माझी निवड केल्यानंतर सुशांतला भेटण्याची माझी इच्छा होती. मात्र ते आता शक्य नाही.” अशी खंत दिग्विजयने व्यक्त केली.