सुशांत सिंह आत्महत्या: तपासासाठी मुबंईत दाखल झालेल्या पटना पोलीसांना BMC केलं क्वारंटाईन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आलेल्या पटणाचे एसपी विनय तिवारी यांना १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे तिवारी यांना मुंबईतली पहीली रात्र गोरेगावच्या एसआरपीएफ कॅम्प घालवावी लागली. तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर बिहार पोलिसांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आमचा तपास रोखण्यासाठी एसपी विनय तिवारींना होम क्वारंटाईन नव्हे तर हाऊस अरेस्ट केल्याचे बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. बिहार पोलिसांचा तपास रोखण्यासाठी हे जाणिवपूर्वक पाऊल उचलल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

https://twitter.com/ips_gupteshwar/status/1290008785617002496?s=20

बिहार डिजेपी गुप्तेश्वर पांडे यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करणारे ट्वीट केलंय. आयपीएस अधिकृत विनय तिवारी आज पटण्याहून मुंबईत त्यांच्या कर्तव्यावर बिहार पोलिसांचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईत गेले. पण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रात्री ११ वाजता त्यांना जबरदस्ती क्वारंटाईन केलंय. मागणी करुनही त्यांना आयपीएस मेस देण्यात न आल्याचेही पांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विनय तिवारी यांना अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये राहायचे आहे. यासाठी ते वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याशी बोलले होते. डीसीपी ९ मधील आयजी हेडक्वार्टरशी त्यांच्या संपर्क करुन देण्यात आला होता. त्यांना राहण्यासाठी रुम देण्यात आली होती. पण त्यानंतर आयजी हेजक्वार्टरने त्यांचे फोन उचलले नाहीत. कोरोनामुळे ऑफिसर्स मेस कार्यरत नाही आहे. तिथे आधीच एक कोरोना रुग्ण आढळला आहे . म्हणून एसपी विनय तिवारींना एसआरपीएफ गेस्ट हाऊसमध्ये थांबविल्याची माहिती सुत्रांकडून कळतेय. पालिकेच्या सुत्रांनुसार विनय तिवारींना १५ ऑगस्टपर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment