महाराष्ट्रातील या नेत्यांच्या नावावर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब ; घोषणेची औपचारिकता बाकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भारत स्वतंत्र झाल्या पासून कॉंग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष मराठी माणूस बनला नव्हता. मात्र कॉंग्रेसने या ऐतिहासिक घटनेसाठी महाराष्ट्रातून एक नाव पक्क केले आहे. माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदी निश्चित करण्यात आले असून त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करणे फक्त बाकी आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्याबाहेर रांगा

सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात आज एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच याच भेटी दरम्यान सुशीलकुमार शिंदे आणि राहुल गांधी हे पक्षाची पुढील देह धोरणे देखील आखण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्या पासून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. तर गांधी घराण्यातील कोणता व्यक्ती या पदावर येणार नाही अशी देखील घोषणा केली. त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा अध्यक्ष पदासाठी होऊ लागली. गांधी घराण्याचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांची या पदी निवड केली जाणार आहे. त्यांच्या नवडी मागे दुसरे एक कारण आहे. ते म्हणजे सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचा दलित चेहरा आहेत. तसेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत त्यांच्या चेहऱ्याचा चांगला उपयोग होऊ शकतो असे काँग्रेसला वाटते आहे.

आमचं ठरलयं ! सतेज पाटील ‘या’ पक्षाकडून लढवणार विधानसभा

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव चर्चेत होते. त्याच प्रमाणे डॉ. मनमोहन सिंग, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट यांची देखील नवे चर्चेत होती. मात्र या सर्वांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी बाजी मारली आहे. गांधी घराण्याचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे जेष्ठ जाणकार यांनी सुशीलकुमार यांच्या नावाला पसंती दिली असल्याचे समजते. त्यामुळेच त्यांची अध्यक्ष पदावर निवड केली जाणार आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई

खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार

चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी

कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य : गिरीश महाजन

आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी

Leave a Comment