पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले, सुषमा अंधारेंचा भाजपवर गंभीर आरोप

sushma andhare
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चर्चेत असतात. मागच्या काही दिवसांपासून त्या अधिक चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी परभणी येथे उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात त्यांनी (sushma andhare) भाजपवर सडकून टीका केली.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी (sushma andhare) भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. पंकजा मुंडे यांना देखील भाजपने मागे टाकले आहे असा आरोप सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी यावेळी केला. भाजपच्या डोक्यात मनुवादी विचार आहेत. यामुळेच भाजपच्या मंत्रिमंडळात एकही महिलेचा समावेश नाही असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

तसेच जिच्या हातात पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी. पण भाजपचे विचार वेगळे आहेत. पंकजा मुंडे सारख्या कर्तुत्वान महिलेला जेव्हा भाजप मागे टाकते, तेव्हा लक्षात येते की भाजपचा विचार महिलांना मागे टाकणारा आहे. कारण मनुवादी विचार त्यांच्या डोक्यात आहे असेदेखील सुषमा अंधारे (sushma andhare) यावेळी म्हणाल्या.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी