‘बच्चू कडूंनी स्वाभिमान गहाण ठेवला पण…’; मंत्रिमंडळावरुन सुषमा अंधारेंची सरकारवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत विश्वासघात झाला असल्याचे बोलत त्यांनी (sushma andhare) हि टीका केली.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
बच्चू कडू हे स्वाभिमानी असून त्यांनी त्यात हिंदुत्वसाठी तडजोड केली. आपला स्वाभिमान गहाण ठेवला. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होते मात्र त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे असे त्या (sushma andhare) म्हणाल्या. तसेच बच्चू कडू यांच्या संपर्कात किती आमदार आहेत, हे त्यांनाच माहिती. मात्र, प्रेम भंगाचं दुःख त्यांना झालं आहे, असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला. सुषमा अंधारे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील आणि रामदास कदम यांच्यावरही टीका केली.

मुख्यमंत्री हे गुळाचा गणपती
यादरम्यान सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या कि, मुख्यमंत्री हे गुळाचा गणपती म्हणून बसविले आहेत. त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊनही उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, मोदी यांनी सुप्रीम कोर्टाच्या पुढची कोणती यंत्रणा केली ते सांगावे असा टोमणासुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती