एकनाथ शिंदेंची गत “नारायण वाघ” सारखी; कोणी उडवली खिल्ली?

0
115
eknath shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केलं होते. तसेच मी सुद्धा सतत शरद पवारांचे सल्ले घेत असतो असेही त्यांनी म्हंटल होतं. यावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदेंची गत मराठी चित्रपटातील “नारायण वाघ” सारखी झाली आहे अशी टीका त्यांनी केली.

TV9 शी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंच्या त्या वक्तव्यावर शरद पवारांनी सुद्धा विश्वास ठेवला नसेल. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून मला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटाचा ‘पार्ट -२’ आठवतो. त्या चित्रपटातील नारायण वाघ जो आहे तो ज्याला समोर बघेल त्याला म्हणायचा, साहेब मी कायम तुमचाच फोटो खिशात घेऊन फिरतो. तशी आमच्या एकनाथभाऊंची गत आहे.

एकनाथ शिंदे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर असतात, तेव्हा ते ‘हम मोदी के लोग है’ असं म्हणतात. कधी ते म्हणतात की देवेंद्रजी या कलाकारामुळे माझं सगळं बरं झालं. आता ते शरद पवारांबद्दलही तसं बोलले. मला वाटतं, एकनाथभाऊंची ही सगळी वक्तव्ये नारायण वाघची वक्तव्ये आहेत. यापलीकडे मला त्यावर अधिक वक्तव्य करावं वाटत नाही, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली.