प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित कोरोना पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जुन्या भांडणावरून एकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास येथील गजानन हौसिंग सोसायटीतील व्यसनमुक्ती केद्रात घडली होती. या प्रकरणी अटकेत असलेला संशयित कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. संशयिताच्या अटक प्रक्रियेत असलेल्या पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गजानन हौसिंग सोसायटीत प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रातील सागर रजपुत याच्या गळ्यावर वार संशयिताने करून गंभीर जखमी केले होते. या हल्ल्याप्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे हल्लाप्रकरणी चौकशी केली.

दरम्यान तो संशयित गुरूवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले. गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेतही कराड शहर व तालुक्यातील बरेच पोलीस कर्तव्य बजावताना कोरोना बाधित झाले होते.

You might also like