हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) ची मागणी खूप वाढत आहे. अनेक लोकं आता छोट्या कारपेक्षा एसयूवीच खरेदी करत आहेत. यामागील कारण असे कि, त्यांच्या स्पोर्टियर लुक, परफॉर्मन्स आणि पॉवर मुळे खडबडीत रस्त्यावरही प्रवास सुखकर होतो.
तसेच कार निर्मात्यांसाठी देखील ही सर्वात आवडीची कॅटेगिरी बनली आहे. जर मागच्या महिन्याच्या सेल्स रिपोर्ट कडे पाहिले तर मेमध्ये भारतातील टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूवी ची लिस्टेड केली आहे.
Tata SUV पहिल्या क्रमांकावर आहे
गेल्या महिन्यात SUV चे 14,614 युनिट्स विकले गेले. यामध्ये Tata Nexon ची SUV सर्वाधिक विकली गेली. यानंतर ह्युंदाईच्या क्रेटाचा नंबर लागतो, ज्यांनी गेल्या महिन्यात 10,973 कार विकल्या. यानंतर मारुती सुझुकी विटारा ब्रेझाने 10,312 युनिट्स आणि अलीकडेच लाँच झालेल्या टाटा पंचने 10,241 युनिट्सची विक्री करून अनुक्रमे तिसरा आणि चौथा नंबर मिळवला.
‘या’ स्वस्त कारचाही लिस्ट मध्ये समावेश आहे
या लिस्ट मध्ये महिंद्राची बोलेरो पाचव्या नंबरवर आहे. ज्यांनी 8,767 युनिट्सची विक्री केली. हे लक्षात घ्या कि, परवडणाऱ्या किंमतीत येणारी ही एक लोकप्रिय कार आहे. त्यापाठोपाठ Hyundai Venue आणि Kia Sonnet अनुक्रमे 8,300 आणि 7,899 युनिट्सच्या विक्रीसह 6 आणि 7 व्या क्रमांकावर आहेत. Kia Seltos ने गेल्या महिन्यात 5,953 युनिट्सची विक्री करून विक्रीत या क्रमवारीत आठवे स्थान पटकावले.
XUV300 मध्ये सर्वाधिक वाढ झाली
या लिस्ट मध्ये 5,069 युनिट्सच्या विक्रीसह महिंद्रा XUV700 नवव्या नंबरवर आहे. महिंद्रा XUV300 ने 10,312 युनिट्सच्या विक्री करून दहाव्या नंबरवर दावा केला आहे. इथे हे लक्षात घ्या कि,महिंद्रा XUV300 ने मेच्या लिस्ट मध्ये भारतातील टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV मध्ये सर्वाधिक वार्षिक वाढ नोंदवली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.carwale.com/new/best-suvs/
हे पण वाचा :
LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या
Business Ideas : मोबाईल-लॅपटॉप रिपेअर सेंटरद्वारे कमवा लाखो रुपये !!!
SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या
LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, आजचे नवीन दर पहा