सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अन्यायकारक विजबिल वसुली विरोधात स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन संस्थापक अध्यक्ष राजु शेट्टी यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात होत असुन सातारा महावितरण कंपनीच्या विरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांचे वतीने सातारा- कोरेगाव रोडवर महावितरण कार्यालय कृष्णानगर समोर रास्ता रोको आंदोलन आज सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते,व्यावसायिक,घरगुती ग्राहक शेतीपंप धारक यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते मात्र पोलीसांनी हे आंदोलन 5 मिनिटात गुंडाळल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि पोलिसांच्यात रास्ता रोको दरम्यान चांगलीच धरपकड झाली यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले…
तुम्हाला फक्त 3 महिन्याचं वीजबिल माफ करा येवडीच मागणी होती. ते तुम्ही अडचणीच्या काळात माफ करणार नाही तर कधी करणार असा सवाल जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी केला. शेती पंपाची वीज 22% शेतकरी पण वापरत नाही त्यात तुम्ही 8 तास वीज पुरवता म्हणजे महिन्यातून 8 दिवस देखील वीज देत नाही आणि तुम्ही वसुली कशी काय करता असा प्रश्न जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केला.
इथून पुढे जर कोणाची वीज कनेक्शन कट केली किंवा कारवाई केली तर हा संघर्ष अटळ असून रक्तपात झाला तरी चालेल पण आम्ही शांत राहणार नाही .आमच्या मागण्या पूर्ण झाल्या शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना माघार घेणार नाही असेही ते म्हणाले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा