…तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांना कारखान्यांकडून थकीत एफआरपी दिली जात नसल्याने तसेच राज्य सरकारकडूनही याबाबात काहीच कारवाई केली जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेट्टी यांनी एफआरपीसाठी येत्या 7 ऑक्टोबरपासून राज्यात ‘जागर एफआरपी’चा हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून आमचा दसरा कडवट झाला तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

ऊसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने व मंत्र्यानी जर शेतकर्याच्या ऊसाचा एफआरपीचा मुद्दा सोडवला नाही तर 7 ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा हे आंदोलन केले जाईल. राज्य सरकारने पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत अद्यापही आलेली नाही.

वास्तविक पाहता राज्य व केंद्र सरकारला एफआरपी द्यायचाच नसल्याचे दिसते. केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान रचल्याचे वाटत आहे. भाजपनेच एफआरपीचे तुकडे करण्याचे अनौरस बाळ जन्माला घातले आहे. मात्र, इथून पुढे आम्ही ते खपवून घेणार नाही. पुढच्या महिन्यात संपूर्ण राज्यात एफआरपीसाठी आंदोलन केले जाईल. स्वाभिमानी संघटना झोपली असा गैरसमज कुणीही करू नये, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.

Leave a Comment