शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार थांबवा अन्यथा झोडपून काढू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसतोडणी मजुरांना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

भिलवडी ऊस पट्टयात साखर कारखान्याचे स्लिप बॉय व ऊस तोडणीदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस कारखान्यास घालण्यासाठी स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, अंकलखोप ऊसपट्टयात तोडणीची धांदल सुरू आहे.

कारखाने सुरु झाल्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ऊस तोडी लांबल्या. याचा परिणाम वेळेत ऊस तुटण्यावर झाला. मार्च महिना आला तरी तोडी मिळेनात. ऊस उत्पादक शेतकरी गट ऑफिसमध्ये हेलपाटे मारून थकले. प्रोग्रॅमनुसार तोड न देता अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्लिप बॉय व तोडणी मुकादमांचा मनमानी कारभार सुरू आहे. स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम व गट कार्यालयातील अधिकारी यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश केल्यावर ऊसाला कोयता लागत आहे.

ऊसतोडणी मशीन करता तीन हजार पासून सात हजार पर्यंत मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत लुटण्याचा धंदा सुरू आहे. काही टोळी मालकांकडून ऊस पळवण्यासाठी फड जाळण्यायाचे प्रकार सुरू आहेत. स्लिपबॉय, मुकादमांनी गैरप्रकार थांबवावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना झोडपून काढेल असा इशारा संदीप राजोबा यांनी दिला.

Leave a Comment