व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

स्वरा भास्करचा करण जोहर आणि आलिया भट याना पाठींबा? 

मुंबई । आपल्या अभिनयासोबत स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाणारी स्वरा भास्कर आता पुन्हा चर्चेत आली आहे. बऱ्याचदा अनेक सामाजिक विषयांवर ती तिचे मत मांडत असते.  काही विधानांमुळे तिला अनेकदा टट्रोल देखील केले गेले आहे. आता पुन्हा एकदा ती बोलली आहे. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर सुरु असलेल्या चर्चांना अनुसरून तिने हे ट्विट केले आहे. या ट्विटमुळे ती आलिया आणि करण जोहर यांना पाठींबा देते आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

“सुशांतने कोणतीच सुसाईड नोट लिहिलेली नव्हती . तो कशातून गेला होता हे आपल्याला माहित नाही. आपल्याला कारण माहित नाही. संकटातून गेलेल्या माणसाच्या दुःख बाहेर काढणे बंद करा, त्याने नोट ठेवली नव्हती. समजले? त्याला तो ज्यातून गेला त्यासंदर्भात बोलायचे नव्हते. त्याला शांतता मिळू दे आणि त्याच्या फॅमिलीला ही प्रायव्हसी मिळू दे” असे ट्विट स्वराने केले आहे. ट्विटमध्ये स्वाराने अप्रत्यक्षपणे करण जोहर आणि आलिया भट्टला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले जात आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर करण जोहर आणि आलिया भट्टचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या दोघांनी सुशांतची खिल्ली उडवली असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी आलियाला ‘नेपोटीझम प्रमोटर’ असे म्हणत सुनावले होते.

तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने व्हिडीओ शेअर करत सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येवरुन बॉलिवूडवर निशाणा साधला. सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याचा खून झाला आहे असे धक्कादायक वक्तव्य तिने केले. तसेच भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने तिला पाठिंबा देत बॉलिवूडवर निशाणा साधला. बरेच कलाकार अप्रत्यक्षरीत्या सुशांतवर अन्याय झाल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे आता सध्या बॉलिवूडमध्ये या अनुषंगाने अनेक चर्चाना उधाण आले आहे.