दिवाळी गोड : अजिंक्यतारा कारखान्याच्या कामागारांना 18 टक्के बोनस जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्‍या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे. होवू घातलेल्या गळीत हंगामातही गाळपास येणार्‍या ऊसाला उच्चतम दर देण्याची परंपरा कायम ठेवू, असे आश्‍वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, 18 टक्के बोनस जाहीर करून आ. शिवेंद्रसिंहराजेंनी कामगार- कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली.

शाहूनगर- शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा 38 व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे आणि श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. समारंभास कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती वनिता गोरे, सातारा पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर, सदस्य छाया कुंभार, जितेंद्र सावंत, आनंदराव कणसे, दयानंद उघडे, छाया कुंभार, अरविंद चव्हाण, दादा शेळके, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, रविंद्र कदम, गणपतराव शिंदे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, दिलीप फडतरे, जेष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, जावली पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, अरुणा शिर्के आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-2022 च्या गळीत हंगामाकरिता 9795 हेक्टर क्षेत्राची नोंद झाली असून 7 लाख 50 हजार मे. टन. गाळपाचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचे कामकाज नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे सुरु असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख कायम चढताच राहिला आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीनुसार संचालक मंडळ कार्यरत असून शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चतम दर देण्याचे स्वप्न साकार होत आहे, याचे मनस्वी समाधान वाटत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. कामगार, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी यंदाही 18 टक्के बोनस देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. चालू गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व तयारी झाली असुंन नोंद असलेला ऊस कारखान्याला घालून नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सभासद शेतकऱ्यांना केले.

व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक केले. संचालक नितीन पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास अजिंक्यतारा सूत गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, गणपतराव मोहिते, अजित साळुंखे, प्रवीण देशमाने, सुनील काटे, धनाजी शेडगे, बाळकृष्ण फडतरे, दादा पाटील, अजय शिर्के, सयाजी कदम, अजिंक्य उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, कामगार- कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.