Swiggy-IRCTC Deal : भारतीय रेल्वे हा प्रवासासाठी उत्तम पर्याय मानला जातो. लांबचा प्रवास असला तरी कमी पैशात आणि आरामदायी प्रवास रेल्वेच्या माध्यमातून केला जातो. परंतु अनेकदा ट्रेन मधील जेवण प्रवाशाना आवडत नाही, किंवा अनेकदा रेल्वेतील जेवनाबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारी बद्दल सुद्धा आपण ऐकलं असेल. परंत्तू आता चिंता करण्याचे कारण नाही. कारण प्रसिद्ध फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy वरून रेल्वेमध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते जेवण मागवू शकता. कंपनीने याबाबत IRCTC सोबत करार केला आहे. त्यामुळे रेल्वे मधून प्रवास करणार्यांना हा मोठा दिलासा आहे.
IRCTC आणि Swiggy यांच्यातील या करारानंतर स्विगी आता ट्रेनमध्येही खाद्यपदार्थ पोहोचवू शकणार आहे. सध्या ही सेवा देशातील ४० स्थानकांवर उपलब्ध असेल. यामध्ये बंगळुरू, भुवनेश्वर, विजयवाडा आणि विशाखापट्टणमच्या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. IRCTC आणि स्विगी यांच्यातील या करारानंतर, आता ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी ई-कॅटरिंग पोर्टलद्वारे स्विगीवर सहज ऑर्डर करू शकतील. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये IRCTC ने Zomato सोबत अशाच पद्धतीचा करार केला होता. त्यातच आता Swiggy ची भर पडल्याने (Swiggy-IRCTC Deal) रेल्वे प्रवाशांना त्यांच्या आवडीचे आणि चमचमीत जेवण खायला मिळणार आहे.
ऑर्डर तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल? Swiggy-IRCTC Deal
सर्वात आधी तुम्हाला IRCTC ई-केटरिंग पोर्टलवर जाऊन तुमचा PNR भरावा लागेल.
यानंतर लिस्ट मध्ये येणाऱ्या आउटलेटपैकी एक निवडावा लागेल.
आता तुमच्या आवडीचा पदार्थ निवडा आणि त्याची ऑर्डर करा.
पेमेंटसाठी, ऑनलाइन पेमेंट किंवा कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर शेड्यूल करा.