घरबसल्या फूड ऑर्डर करताय? Swiggy, Zometo आता रात्री 8 नंतर ऑर्डर घेणार नाहीत

मुंबई : राज्यात करोनाची वाढती संख्या पाहता सर्वत्र कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. रात्री आठ नंतर संचार बंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर घर बसल्या स्विगी आणि झोमॅटो सारख्या ॲप वरून अन्न मागण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. स्विगी आणि झोमॅटो सारख्या डिलिव्हरी आता आठ नंतर ऑर्डर घेणे बंद केले आहे.

या दोन्ही अॅप कडून आपल्या ग्राहकांना नाईट कर्फ्यूच्या आदल्या दिवशी 5 एप्रिलला नोटिफिकेशन पाठवून माहिती देण्यात आली की त्यांनी आपली आर्डर रात्री 8 वाजण्याच्या आधी करुन घ्यावी. ज्यामुळे लवकरात लवकर तुमच्या पर्यंत तुमचे जेवण पोहचण्यास मदत होईल. या दोन्ही अॅप कडून आपल्या युजर्सला मेसेजच्या माध्यमातून माहीती देण्यात आली की रात्री 8 वाजल्यानंतर कोणतीही ऑर्डर स्विकारल्या जाणार नाही.

झोमॅटो स्विगी यासारख्या फुट डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या रात्री 8 वाजल्यानंतर ऑर्डर घेणार नाहीत . रात्री 8 वाजल्यानंतर तुम्ही जर झोमॅटोवर फूड ऑर्डर केले तर तुम्हाला “We’re currently not accepting orders online. We’ll be back soon.” हा मेसेज दिसणार आहे. स्विगी वर मेसेज लिहीला असेल “We are not delivering here at the moment!”। या दोन्ही फूड डिलीव्हरी अॅप्सने हा निर्णय राज्य सरकार व्दारा प्रस्थापित केलेल्या निर्देशानुसार केला आहे.

You might also like