Monday, January 30, 2023

तुजारपूर येथे पत्नीसह शेजार्‍यावर तलवारीने हल्ला : हल्लेखोर पतीची गळफास आत्महत्या

- Advertisement -

सांगली | वाळवा तालुक्यातील तुजारपूर येथे पती पांडूरंग बाबुराव यादव- सासणे व पत्नी लक्ष्मी यांचे भांडण सुरु होते. यादरम्यान पतीने पत्नीवर तलवारीने हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. या दरम्यान तीची मदत करण्यास पुढे सरसावलेले शेजारी वसंत बाबुराव पवार यांच्यावर देखील तलवारीने हल्ला करुन जखमी केले. घाबरलेल्या पांडुरंगने हल्ल्यानंतर घराची कडी लाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला असून लक्ष्मी यादव व वसंत पवार यांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेली माहीती अशी, सकाळी पांडूरंग यादव यांनी पत्नी लक्ष्मी हिच्याशी वाद केला. किरकोळ वाद वाढत गेला. या वादातून तलवार घेत पांडूरंग यांनी पत्नी लक्ष्मी हिच्यावर तलवारीने हल्ला चढवला. डोक्यावर व हातावर घाव वर्मी लागला. दरम्यान रस्त्याने जाणार्‍या वसंत पवार यांनी का भांडण करता ? अशी विचारणा यादव यांना केली. यावेळी रागाच्या भरात पांडूरंग यादव यांनी वसंत पवार यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या डोक्यावर व हातावर हल्ला केला. या झटापटीत पत्नी लक्ष्मी रक्ताच्या थोरोळ्यात निपचिप पडली. आता पत्नी हल्ल्यात ठार मारली गेली. या भितीपोटी पांडुरंग यादव यांनी अंगणातून घरात धाव घेतली आणि घाबरून घरात जावून आतून कडी लावून घेतली.

- Advertisement -

दरम्यान शेजारच्या नागरिकांनी जखमी अवस्थेत लक्ष्मी व वसंत पवार यांना इस्लामपुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचेवर उपचार सुरू आहेत. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही जखमींना दवाखान्यात नेल्यावर चुलत भाऊ व नागरिकांनी पांडुरंग यादव यांच्या घराचे दार ठोठावले. खिडकीतून आत डोकावल्यावर बाथरूम समोरच्या बीमला गळफास लावलेल्या अवस्थेत पांडुरंग यादव-सासणे दिसून आले.