कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
अंबाई टँक परिसरात खाद्यपदार्थांच्या गाडीवर झालेल्या किरकोळ वादातून दोघा तरुणांवर तलवार हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचा माजी नगरसेवक दत्ता विलास टिपुगडे (वय ५०, रा. सरनाईक कॉलनी, शिवाजी पेठ) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. दरम्यान, यापूर्वी त्याचा मुलगा सागर टिपुगडे याला अटक केली होती.
स्वप्निल चंद्रकांत पाटील (वय ३२), अजय विलास पाटील (३६, दोघेही रा. माजगावकर मळा) हे दोघेजण ११ डिसेंबरला सायंकाळी शालिनी पॅलेसच्या पिछाडीस असलेल्या अंबाई टँक परिसरातील टिपगुडे मालक असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर नाष्टा करण्यासाठी गेले होते.
यावेळी या दोघांचा आइस्क्रीमचा गाडा चालविणाऱ्या कामगाराशी वाद झाला होता. त्याने मालक टिपुगडे बापलेकास बोलवून घेतल्यानंतर या बापलेकांनी तलवार हल्ला केला होता. दोघांच्या डोक्यात तलवारीचे घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी जखमी स्वप्निल पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गेले महिनाभर संशयित टिगुपडे हा पसार झाला होता. अखेर त्याला पोलिसांनी अटक केली.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
एसबीआय ग्राहकांसाठी खास सुविधा, आता डेबिट कार्ड खिशात ठेवण्याची गरज नाही!
R.R.पाटील यांच्यानंतर आता जयंत पाटील संभाजी भिडेंच्या बचावाला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा एकदा घसरण; गाठला महिनाभराचा नीचांक