हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मासिक पाळी हि महिलांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. मासिक पाळीच्या माध्यमातूनच एकादी मुलगी हि आई बनत असते. म्हणून मासिक पाळी हि महिलांच्या आरोग्याशी निगडित असलेला मेनोपॉझ या आजाराबध्दल आपण जाणून घेणार आहे. हा आजार म्हणजे एका ठराविक वर्षानंतर महिलांच्या जीवनातील मासिक पाळी येणे बंद होते. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातून त्यांचे मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ ढासळायला सुरुवात होते. हा विषय फार चिंतेचा असू शकतो आणि जास्त प्रमाणात डॉक्टरांचा सल्ला घेतला गेला तर त्याचे जास्त वाईट किंवा चांगले परिणाम दोन्ही होऊ शकतात.
मेनोपॉझ हि प्रकिया साधारण पणे ढोबळ मानाने पन्नाशी नंतर ही प्रक्रिया सुरू होते.. सध्याच्या बदलत्या खानपानाच्या सवयी, शारीरिक स्वास्थ्याची कमतरता आणि धकाधकीच्या जीवनामुळे स्त्रियांचा मेनोपॉझ चाळीशी नंतरही येऊन ठेपला आहे. आणि ही प्रक्रिया काही महिने नाही.. तर काही वर्षे चालते. या प्रक्रिया मध्ये मानसिक त्रासासोबत शारीरिक त्रास देखील खूप वाढतो. अंगदुखी यासारख्या समस्या निर्माण होतात. डोकेदुखी हि त्रीव्र प्रमाणात वाढते. शरीराच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोणत्या गोष्टींमुळे मासिक पाळी जाण्याच्या नंतर होणारा त्रास हा कमी होऊ शकतो.
— वजन नियंत्रित करा
ज्यावेळी महिलांची मासिक पाळी जाते त्यावेळीस त्यांच्या शरीराचे वजन हे जास्त प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करणे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. वजन नियंत्रित करणे आवश्यक आहे. वजन वाढण्याने इतर आजारांना आमंत्रण मिळते. कोलेस्टेरॉल वाढणे, हाय बीपी, हृदयरोग अशा अनंत रोगांना आपण फक्त अतिवजनामुळे बळी पडतो.. वजन जसे वाढत जाते त्या स्पीड मध्ये ते कमी करणे मुश्किल असते.. त्यातून गुढगे दुखी, पाठदुखी, सांधेदुखीचे आजार जडले तर व्यायाम करणेही अवघड होते..
— रोज व्यायाम करा
आपले शरीर हे निरोगी राहण्यासाठी दररोज कमीत कमी काही वेळ आपण व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करणे हे सगळ्याच शारीरिक त्रासांवरचे औषध आहे. व्यायामाने कॅन्सर, हृदररोग, बीपी, डायबेटीस लठ्ठपणा सारख्या आजारांवरही मात मिळवता येते.
— भरपूर पाणी प्या
शरीरात जास्तीत जास्त पाण्याचे प्रमाण ठेवा. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्रास होणार नाही. महिलांना मेनोपॉझ च्या काळात त्यांच्या शरीरासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. आहारात पाणी ठेवणे गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम वाढते. त्यामुळे वाढणारे वजन नियंत्रित करण्यासही हातभार लागतो. जेवणा आधी एक ग्लास पाणी प्यायल्यास कॅलरीजही कमी खाल्ल्या जातात..
— कोणकोणते अन्नपदार्थ टाळावेत
साखर किंवा बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. जंक फूड असे पदार्थ तर मुळीच खाऊ नयेत. त्यामुळे तुमच्या मासिक पाळीवर विशेष परिणाम होतो. डिप्रेशन यासारख्या समस्या निर्माण होतात. हवाबंद डब्यातील कोणताही पदार्थ खाऊ नये. खूप जास्त प्रमाणात मटण , चिकन किंवा उष्ण पदार्थ खाऊ अन्य. भरपूर फळे आणि भाज्या खा. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. मेनोपॉझ मधल्या बऱ्याच तक्रारींवर रामबाण औषध म्हणजे भरपूर फळे आणि भाज्यांचे सेवन.मेनोपॉझ मध्ये वजन वाढू द्यायचे नसल्यास हलका आहार महत्वाचा आहे. फळे आणि भाज्या खाऊन पोट तर भरते आणि शरीरात मेदवृद्धी होत नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’