T20 Rankings : श्रेयस अय्यरने मिळवले 27 वे स्थान, कोहली आणि रोहित दोघेही टॉप-10 मध्ये नाहीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई । श्रेयस अय्यरने ICC T20 क्रमवारीत 27 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचबरोबर विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. या विजयाचा खेळाडूंच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे. अय्यरला मालिकेत तीन नाबाद अर्धशतकांचा मोठा फायदा झाला, ज्यामुळे तो फलंदाजांच्या लिस्टमध्ये 18 व्या स्थानावर पोहोचला. 27 वर्षीय अय्यरने या मालिकेत 3 सामन्यात 174 च्या स्ट्राईक रेटने 204 धावा केल्या. संपूर्ण मालिकेत तो नाबाद राहिला होता.

श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने तीन स्थानांची प्रगती करत गोलंदाजांच्या क्रमवारीत 17 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेच्या पाथुम निसांकाने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 75 धावा केल्या, ज्यामुळे तो क्रमवारीत 9व्या स्थानावर पोहोचला आहे, तर भारताचा माजी कर्णधार कोहली 5 स्थानांनी घसरून 15व्या स्थानावर आला आहे. कोहलीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा 13 व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाज म्हणून फक्त केएल राहुल हा टॉप-10 मध्ये आहे. तो दहाव्या स्थानावर आहेत. T20 च्या टॉप-10 मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.

कुमारा पहिल्यांदाच टॉप-40 मध्ये
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा पहिल्यांदाच टॉप-40 गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. यजमान न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने कसोटी क्रमवारीत सर्वात मोठी झेप घेतली असून, तीन स्थानांची झेप घेत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडाने 2 सामन्यांच्या मालिकेत 10 विकेट घेतल्या. न्यूझीलंडचा काईल जेम्सन पाचव्या तर टीम साऊथी सहाव्या स्थानावर घसरला आहे.

Labushen पुन्हा टॉपवर
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. एकदिवसीय क्रमवारीत, अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज रशीद खानने बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत आपले स्थान पुन्हा मिळवले आहे. तो सहा स्थानांनी 9व्या स्थानावर आहे, तर बांगलादेशचा मेहदी हसन मिराज 7व्या स्थानावर घसरला आहे.

Leave a Comment