T20 World Cup 2024 Schedule | क्रिकेट प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ICC T20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेचं आयोजन संयुक्तपणे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये कऱण्यात आले आहे. सर्व संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली असून नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना पाहायला मिळणार आहे. 1 जून ते 29 जून या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचे सामने होणार असून यामध्ये एकूण 20 संघाचा सहभाग पाहायला मिळेल. 29 जून रोजी अंतिम सामना हा बार्बाडोस येथे होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत सविस्तरपणे
भारताचे किती होतील सामने?
भारताचा पहिला सामना हा आयर्लंड सोबत होणार आहे. दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध 9 जून रोजी ठेवण्यात आला आहे. तिसरा सामना हा अमेरिकेसोबत 12 जूनला होईल. तर 15 जूनला चौथा सामना होणार आहे. T-20 वर्ल्डकपची ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. यामध्ये अमेरिकेतील एकूण तीन मैदानावर तर वेस्ट इंडिज मध्ये एकूण सहा मैदानावर हे सामने होणार आहेत. या सामन्यासाठी संघाची विभागणी करण्यात आली आहे. ती विभागणी कशी आहे. ते पाहू.
प्रत्येकी ५ संघाची ४ गटात विभागणी-
T-20 वर्ल्डकप सामन्यामध्ये (T20 World Cup 2024 Schedule) एकूण 20 सामने होणार असून एकूण पाच संघांचे चार संघात विभाजन करण्यात आले आहे. म्हणजेच ‘अ’, ‘ब’, ‘क ‘, ‘ड’ अश्या गटात विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये भारताला ‘अ’ गटात सामील करण्यात आले आहे. त्यांचसोबत पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए यांचाही समावेश आहे. ‘ब’ गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान यांना ठेवण्यात आले आहे. ‘क’ गटात न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, तर ‘ड’ गटात दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ यांना सोबत ठेवण्यात आले आहे. यानुसार हे सामने होणार आहेत.
एकूण तीन टप्प्यात होणार स्पर्धा- T20 World Cup 2024 Schedule
T-20 वर्ल्डकपचे स्वरूप हे एकूण तीन टप्प्यात उतरवण्यात आले आहे. त्यामध्ये लीग स्टेज, सुपर -8 आणि नॉकआऊट असे टप्पे पाडण्यात आले आहे. आता यां टप्प्यामध्ये नेमक काय असणार? तर लीग स्टेज हा पहिला टप्पा असून 1 जून ते 18 जून या दरम्यान प्रत्येक गटातील एक – एक संघ आपापसातील सामना खेळणार आहेत. यामध्ये जे संघ जिंकतील ते पिढीला सामान्यामध्ये जातील. दुसरा टप्पा हा सुपर – 8 चा असून यातील सामने हे 19 ते 24 जून या कालावधीत खेळले जाणार आहेत. यामध्ये एकूण आठ अव्वल संघाचा प्रत्येकी एक सामना होणार आहे. यामध्ये यश मिळालेल्या एकूण चार संघाला पुढील टप्प्यात पाठवले जाणार आहेत. तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे नॉकआऊट. याचे सामने 26 ते 29 जून या कालावधीत खेळवले जाणार आहेत. हे सामने ज्यांना सुपर -8 मध्ये यश मिळाले आहे. अश्या संघामध्ये खेळवले जाणार आहेत. या टप्प्यात एकूण चार संघ असणार आहेत. ज्यामध्ये पहिला सामना हा 26 जूनला, दुसरा 27 जूनला आणि तिसरा आणि अंतिम सामना हा 29 जूनला होणार आहे. त्यामुळे या सर्व सामन्यांसाठी क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत.