सदरबझार मध्ये लपून बसलेल्या तडीपार गुंडास अटक

Satara Tadipar Arrested
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्हयातील सर्व अधिकारी यांची जिल्ह्यामध्ये हजर होताच क्राईम मिटींग घेतली. त्यामध्ये जिल्ह्यातील विविध गुन्ह्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यापैकी सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेले जे गुंड सातारा जिल्ह्यामध्ये लपून वावरत आहेत. त्यांची माहिती घेवून त्यांचेवर कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे मारामारी, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेला रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार तेजस संतोष शिवपालक (रा. लक्ष्मीटेकडी- झोपडपट्टी, सदरबझार) हा लक्ष्मी टेकडी परिसरात लपून वावरत होता. याबाबतची गोपनीय माहिती सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती. त्यास तात्काळ डी. बी. पथकातील पोलीस स्टाफने सदरबझार परिसरामध्ये ठिकठिकाणी शोध मोहिम राबवून सदर तडीपार इसमास ताब्यात घेतले. त्याचेवर तडीपार आदेशाचे उल्लंघन केलेप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा. पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, मपोनि. वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे, पो. कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल घुमाळ, गणेश भोंग यांनी केलेली आहे.