फडणवीस, कटुता संपवाच…. कामाला लागा; सामनातून साद??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फडणवीस कटुता संपवाच.. . कामाला लागा या मथळ्याखाली सामनातून देवेंद्र फडणवीस यांना साद घालण्यात आली आहे. महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आले आहे. तर कटुता संपविण्याचा विडा उचलावा लागा कामाला असं सामनातून म्हंटल आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत सामोपचाराच्या, शहाणपणाच्या गोष्टी केल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही. विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. श्री. फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपणा आला असल्याचे जाणवू लागले आहे. दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा.

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेल्यांना जाता खंत वाटू लागली असेल तर या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल असं ठाकरे गटाने म्हंटल.

महाराष्ट्रात कटुता का व कोणी निर्माण केली? महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात तीन सत्तांतरे झाली. त्यातील दोन सत्तांतरे थेट श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. श्री. अजित पवार यांच्या मदतीने फडणवीस व त्यांच्या पक्षाने सत्तांतर करण्याचा प्रयत्न केला. तो फसला. त्या वेळीही केंद्रीय सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला गेला. हा प्रयोग यशस्वी झाला असता तर तो लोकमताचा कौल किंवा जनतेची किंवा परमेश्वराची इच्छा ठरली असती. पण महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताच हे घटनाबाहय लोकांचा पाठिंबा नसलेले सरकार असल्याचे सांगितले गेले. हा दुटप्पीपणा चांगला नाही. प्रामाणिकपणाने बोलत आहात तर त्यात गल्लत का करता? असा चिमटाही सामनातून काढण्यात आला.

महाराष्ट्रातील राजकारणात कटुता राहू नये व राज्याच्या कल्याणासाठी सगळ्यांनी एकत्र बसले पाहिजे हीच राज्याची परंपरा आहे. बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी हे बेरजेचे राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करता कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून ठाकयापर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल? असा सवाल शिवसेनेनं केला.

खरी शिवसेना कोणती? है। फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळ्यात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून घोडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ अहित. पण त्याचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे. अर्थात राज्यात कटुता आहे ती दूर केली पाहिजे हा विचार देवेंद्र फडणवीस यांच्या मनात देणे हे महत्त्वाचे . उद्या काय होईल असे जर तर राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आले आहे. तर कटुता संपविण्याचा विडा उचलावा लागा कामाला असं सामनातून म्हंटल आहे