API कुलकर्णींचा ‘तो’ फोटो नजरेपुढून जातंच नाहीय..गृहमंत्री अनिल देशमुखांची भावनिक पोस्ट

मुंबई । कोरोना विषाणूंसोबत महाराष्ट्र पोलीस रस्त्यावर उतरून लढत आहेत. पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काळ कुलकर्णी यांना आदरांजली वाहत मुंबई पोलिसांच्या कार्याला सलाम केला … Read more

आत्ता पर्यंत ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३ व पुणे येथील १ अशा ४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. आत्तापर्यंत ४२ पोलीस अधिकारी व ४१४ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. … Read more

लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले … Read more

वाधवान कुटुंबियांना परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्तांची नार्को टेस्ट करा – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी सकलेन मुलाणी येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबिय गृहखात्याच्या प्रधान सचिवांच्या पत्राद्वारा लोणावळ्याहून पाचगणीत दाखल झाले होते. सदर प्रकार माध्यमांत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना परवानगी देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांच्यावर कारवाई करत सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांकडून सरकारव टिके होत आहे. अशात आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई … Read more

वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई प्रतिनिधी | येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांनी गृहखात्याचे प्रधान सचिव यांच्या पत्राच्या आधारे लोणावळा ते पाचगणी प्रवास केल्याचे समोर आले. यानंतर विरोधीपक्षाने यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना पत्र देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांनी सरकारवर टिका … Read more

वागवान कुटुंबियांना परवानगीचे पत्र देणे गृहखाते सचिवांच्या अंगलट, अभिनव गुप्त सक्तीच्या रजेवर

मुंबई | येस बँक घोटाळ्यातील वागवान कुटुंबाला लोणावळ्याहून पाचगणीला जाण्यासाठी गृहखात्याचे प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांनी परवानगीचे पत्र दिले होते. वागवान कुटुंबियांना सदर परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करुन कारवाई करु असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल रात्री सांगितले होते. त्यानुसार आता पत्र देणारे गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे समजत आहे. यामुळे … Read more

मोठी बातमी! लोणावळ्याहून पाचगणीत आलेल्या ‘त्या’ २३ जणांना गृहखात्याच्या प्रधान सचिवांचेच पत्र

मुंबई | कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात सर्वत्र लाॅकडाउन आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सील करण्यात आल्या आहेत. मात्र अशातही येस बँक घोटाळ्यातील बागवान कुटुंबिय लोणावळ्याहून पाचगणीला पोहोचल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मंत्रालयातील खास पत्राच्या सहाय्याने बागवान कुटुंब पाचगणीला पोहोचल्याची माहिती होती. मात्र आता हे पत्र दुसर्‍या तिसर्‍या कोणाचे नसून गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता … Read more

वाधवान कुटुंबाला पाचगणीला जायची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार – अनिल देशमुख

मुंबई | मुंबईतील उच्चभ्रू वाधवान कुटुंब मंत्रालयातील खास पत्राच्या सहाय्याने खंडाळ्यातून सातारा जिल्ह्यातील पाचगणीला गेल्याने एकच खळबळ उडाली होती. देशात सर्वत्र लाॅकडाउन असताना आणि राज्यात जिल्ह्यांच्या सीमा सील असताना वागवान कुटुंबिय ५ गाड्या घेऊन पाचगणीत कसे गेले? त्यांना परवानगी कशी मिळाली याबाबत चौकशी करणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. वाधवान … Read more

महाराष्ट्र सरकार ११ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले की ११,००० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे. ते म्हणाले की, सात वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या कैद्यांना सरकार पॅरोलवर सोडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी वर्षा लॉन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेताना राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार … Read more

अन्यथा..राज्यात ‘कर्फ्यू’ लावावा लागेल- गृहमंत्री अनिल देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनामुळे जमावबंदी असून सुद्धा लोकांमध्ये त्याचे गांभीर्य दिसत नाही आहे. जनता कर्फ्यू उठताच अनेक लोकांनी जमाव बंदीच्या आदेशाला धाब्यावर बसवत आपल्या खासगी वाहनाने रस्त्यावर गर्दी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागरिकांना कडक इशारा दिला … Read more