‘या’ कंपनीकडून दुध दरवाढ जाहीर, आता ग्राहकांवर परिणाम होणार का? हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जागतिक दुग्धशाळेतील प्रमुख लॅक्टलिस (Lactalis) ने गुरुवारी आपल्या दुधाच्या खरेदी किंमतीत प्रतिलिटर 1 रुपये वाढ करण्याची घोषणा केली. सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज (ज्याचे नाव प्रभात ब्रँड आहे) या नावाने लॅक्टलिस महाराष्ट्रात कार्यरत आहेत. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुधाची सरासरी किंमत प्रति लीटर 30 रुपये आहे आणि लॅक्टलिस आता 3.5/8.5 SNF … Read more

केजयेथील महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Women Suicide

केज | केज येथील महाविद्यालयीन तरूणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेची केज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 19 वर्षीय तेजल संपत चव्हाण ही तरुणी अंबाजोगाई येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तेजल हिने शहरातील धारूर … Read more

पाथर्डी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर ; तरुणांच्या लढाईचा विजय

अहमदनगर । राज्यातील ग्रामपंचयातीचे निकाल आज जाहीर झाले. पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवीचे ग्रामपंचायतची निवडणूकही प्रतिष्ठा पणाला लागेल अशीच झाली आहे. याठिकाणी तरुणांनी स्वबळावर लढलेल्या जय भवानी ग्रामविकास आघाडीने प्रस्थापितांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या 25 वर्षानंतर धामणगावमध्ये सत्तांतर झालं आहे. गेल्या 25 वर्षांपासून गावच्या राजकारणात सक्रिय असलेले सरपंच भास्कर पोटे आणि वृद्धेश्वर सहकारी … Read more

डॉ. विखे-पाटील हॉस्पिटलच्या लॅबविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

अहमदनगर । कोरोनाचा (Covid 19 Report) चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील रुग्णालयाच्या लॅब अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा अहवाल दिल्याप्रकरणी विळदघाट येथील विखे-पाटील रुग्णालयाच्या क्रस्ना डिग्नोस्टिकस प्रा. लि लॅबचे प्रभारी अधिकारी, लॅब टेक्निशिन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. येथील बांधकाम व्यावसायिक अशोक खोकराळे यांनी याप्रकरणी पोलिसात … Read more

राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांत सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

मुंबई । भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे (ICMR ) गेल्या महिन्यात देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो सर्व्हे घेण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पॉझीटिव्ह रुग्णांचे प्रमाण १.१३ एवढे आढळून आले आहे. राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण … Read more

कोरोनातून बर्‍या झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

अहमदनगर प्रतिनिधी | देशात सर्वत्र कोरोना संकटकाळात अग्रभागी लढणाऱ्या योद्ध्यांमध्ये पोलीस महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात ही पोलीस बांधव मोठ्या प्रमाणात आपले कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याचे देखील आढळून आले आहे. यामध्ये काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. मात्र कोरोना संकटातून वाचलेल्या एका पोलिसाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. मोटारीच्या … Read more

संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

जुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

अहमदनगर । गेल्या काही दिवसात कोरोनाशी संबंधित बरीच माहिती समोर येते आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एका कोरोनाबाधित स्त्रीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पण ती उपचारादरम्यान दगावली असल्याची माहिती मिळाली आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर एका दिवसाने तिचा मृत्यू झाला आहे. ही महिला मुंबईहून … Read more

कोरोनासोबत आता ‘सारी’चाही धोका वाढतोय; अहमदनगर मध्ये सापडले ४२ रुग्ण

अहमदनगर प्रतिनिधी | जिल्ह्यात ‘सारी’चे (सिव्हीअर अॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि महात्मा फुले जीवनदायी योजने अंतर्गत मान्यता दिलेल्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे. तर ‘करोना तपासणीच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव … Read more

नागरिकांच्या मानसिक संतुलनासाठी समर्पण ध्यानयोगाचा पुढाकार, युट्यूबवरुन मोफत प्रसारण

अहमदनगर | समर्पण ध्यानयोगाचे प्रणेते शिवकृपानंद स्वामी यांच्याद्वारे वर्तमान परिस्थितीच्या संदर्भात सर्व साधकांना लॉकडाउनच्या दरम्यान घरी राहून, सरकारने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार समर्पण ध्यानयोग संस्काराची सर्व ध्यानकेंद्रे व आश्रम बंद करून सरकारला पूर्ण सहयोग केला जात आहे. स्वामी यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या निर्देशांनुसार देश विदेशातील साधक मोठ्या संख्येने घरी राहूनच … Read more