तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेक्षणात मनपाची; शाळा ठरली मराठवाड्यातून अव्वल

औरंगाबाद |  भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय अंतर्गत सलाम फाऊंडेशनच्या तंबाखूमुक्त नियंत्रण सर्वेत मिटमिटा येथील मनपा शाळा मराठवाड्यातून अव्वल ठरली असून सर्वत्र या शाळेने एक वेगळा आदर्श घडवून दिला आहे. भारत सरकार, आरोग्य मंत्रालयाअंतर्गत तंबाखूमूक्त नियंत्रण शाळा अभियान मार्गदर्शक सूचनानूसार पडेगाव, मिटमिटा येथील मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा यांनी उपक्रम राबविले. यात विद्यार्थी, पालक, समाज, परिसर … Read more

कोरोनाचे नियम पायदळी; बजाज कंपनी प्रशासनाचा हलगर्जीपणा

औरंगाबाद | वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. बसमध्ये मोठ्या संख्येने कामगारांना कोंबून ने-आण केली जात आहे. हा सर्व प्रकार गावातील तरुणांनी समोर आणला. एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे बसमध्ये क्षमते पेक्षा अधिक कामगार दिसत असून हा प्रकार त्वरित थांबविण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. वाळूज … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

जलवाहिनी हलवण्यासाठी सव्वा कोटीची तरतूद; निविदा प्रक्रियेद्वारे होणार जलवाहिनी स्थलांतराचे काम

औरंगाबाद | शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या … Read more

बनावट कागदपत्रांआधारे नोकरी प्रकरण; आणखी दोघा जणांना अटक

औरंगाबाद | बनावट कागदपत्रांआधारे सरकारी नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुद्ध तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या १८८ जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात गुन्हे शाखेने रविवारी आणखी दोघांना अटक केली. निवृत्त क्रीडा उपसंचालक राजकुमार दत्तात्रय महादावाड (वय ५९) आणि क्रीडा अधिकारी भाऊराव रामदास वीर (वय ५२, रा. ताजनगर, शेवगाव जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. क्रीडा अधिकारी भाऊराव वीर आणि १५ मार्च … Read more

वाळू वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची मागणी; तहसीलदारास रंगेहाथ पकडले

औरंगाबाद | शहरात वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना तहसीलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, शहर महसूल परिसराच्या हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रतिमहिना दीड लाख रुपये हप्ता देण्याची मागणी तक्रारदारकडे तहसीलदार देशमुख यांनी केली होती. ही रक्कम जर दिली … Read more

५ पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण, पोलीस आयुक्तालयातील नियोजित बैठक रद्द

औरंगाबाद | शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पाच  निरीक्षक कोरोनाबधित असल्याचे सोमवारी पोलीस आयुक्तांनी नियोजित केलेल्या क्राईम आढावा  बैठकीदरम्यान समोर आले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी नियोजित बैठक रद्द केली. शहरातील १७ पोलीस निरीक्षकांची कोरोना अँटीजन चाचणी सोमवारी करण्यात आली. त्यापैकी ५  पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शहर पोलीस दलात आतापर्यंत ३९ अधिकारी आणि ३०२ … Read more

आव्हानात्मक परिस्थितीत उद्योगांची वाटचाल, योग्य काळजीसह कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. प्रशासनाने अंशत: लॉकडाउनसह गर्दी व प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. उद्योगांना आवश्यक त्या उपाययोजना, तपासणी, चाचणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करत उद्योगांमध्ये उत्पादन सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला, सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रशासनाने अंशत: … Read more

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

कोविड सेंटरमध्ये खाटाच शिल्लक नाही; घरीच उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

औरंगाबाद | शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. या सेंटरमध्ये खाटा शिल्लक नाहीत. त्यामुळे उपचारासाठी कोविड केअर सेंटरकडे येणाºया बाधितांना औषध देऊन घरी पाठवण्यात येत असल्याचे काही बाधितांच्या नातेवाइकांच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले आहे. शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली आहे. पाच-सहा दिवसांपासून तर रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण … Read more