कोविड सेंटरमध्ये खाटाच शिल्लक नाही; घरीच उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला

औरंगाबाद | शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेचे कोविड केअर सेंटर फुल्ल झाले आहेत. या सेंटरमध्ये खाटा शिल्लक नाहीत. त्यामुळे उपचारासाठी कोविड केअर सेंटरकडे येणाºया बाधितांना औषध देऊन घरी पाठवण्यात येत असल्याचे काही बाधितांच्या नातेवाइकांच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले आहे.

शहरात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांची संख्या वाढू लागली आहे. पाच-सहा दिवसांपासून तर रोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे पालिकेने कोविड केअर सेंटरची संख्याही वाढवली. पूर्वी ज्या इमारतींमध्ये क्वारंटाइन सेंटर होते, तेथे आता कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटरची संख्या वाढली तरी वाढत्या रुग्णांमुळे खाटांची संख्या आता कमी पडू लागली आहे.

कोरोनाबाधितांच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाबाधित व्यक्ती कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी गेल्यावर त्याला खाटा शिल्लक नाहीत, असे दोन-तीन दिवसांपासून सांगितले जात आहे. गोळ्या औषध देऊन त्याला घरी पाठवले जात आहे. खाटा रिकाम्या झाल्यावर तुम्हाला कळवू, असे सांगून त्यांचा फोन नंबर लिहून घेतला जात आहे. कोरोनाबाधितांना परत पाठवले जात असल्यामुळे संसगार्चा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. कोविड केअर सेंटरची संख्या वाढवण्याचे काम पालिकेने युद्धपातळीवर करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like