जलवाहिनी हलवण्यासाठी सव्वा कोटीची तरतूद; निविदा प्रक्रियेद्वारे होणार जलवाहिनी स्थलांतराचे काम

औरंगाबाद | शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे.

शहराची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जात आहे. या कामात जलवाहिनींचा अडथळा येत असल्यामुळे त्या स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. अर्धा किलोमीटर अंतराच्या जलवाहिनी शिफ्टिंगसाठी महापालिकेने तब्बल एक कोटी १८ लाख ८० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. येत्या काही महिन्यात हे काम सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावीर चौक ते चिकलठाणा हा सुमारे दहा किलोमीटरचा रस्ता जालना रोड म्हणून ओळखला जातो. हा रस्ता औरंगाबादच्या दृष्टीने जीवनवाहिनीच आहे.

वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी क्रांती चौक, मोंढानाका, सेव्हन हिल्स आणि सिडको बसस्टँड या ठिकाणी उड्डाणपुलही बांधण्यात आले. रस्ता रुंदीकरणाच्या कामात मातोश्री लॉन्स ते मिनी घाटी चिकलठाणा या दरम्यान दोनशे आणि तीनशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीची जागा बदलावी व रुंद करण्यात आलेल्या रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात यावी, अशी मागणी प्राधिकरणाने महापालिकेकडे केली होती. प्राधिकरणाने केलेली मागणी मान्य करीत महापालिकेने जलवाहिनी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी १८ लाख ८० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. १९ मार्च २०२१ रोजी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता निविदा प्रक्रिया करून जलवाहिनी स्थलांतराचे काम केले जाणार आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

You might also like