लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ

औरंगाबाद : कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून अंशतः लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यातच दुसरीकडे जाधववाडी मंडई देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ग्राहकच नसल्याने शेतकरी त्रस्त झाले असून आज सकाळी चक्क शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली. एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील … Read more

परीक्षा रद्द होताच औरंगपुऱ्यात विद्यार्थांचा धिंगाणा; शेकडो विद्यार्थानी अडविला रस्ता

औरंगाबाद : या महिन्यात होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळताच औरंगाबाद शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी औरंगपुरा भागात गोळा होत रस्त्यावरती धिंगाणा घालत रस्ता अडविला यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 14 मार्च रोजी एमपीएससी ची परीक्षा होणार होती मात्र कोरोनाच्या कारणाने ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली. ही माहिती वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरताच पुण्यामध्ये हजारो … Read more

आयुष्यातील उमेदीची वीस वर्षे सरकार पुन्हा देणार का? ; सिमीच्या खटल्यातून निर्दोष सुटलेले सिद्दिकी यांचा सवाल

औरंगाबाद: अखिल भारतीय अल्पसंख्यांक शिक्षा बोर्डाकडून घेण्यात आलेला चर्चासत्र सिमीचा असल्याचा आरोप करत यात सहभागी झालेल्या १२७ जणांना एक दिवसआधी पोलिसांनी अटक केली होती. ११ महिने तुरुंगात राहिल्यानंतर यातील अनेकांना जामीन मिळाला. तब्बल वीस वर्षानंतर ६ मार्च २१ रोजी १२७ जण निर्दोष असल्याचा निकाल न्यायालयाने दिला मात्र हा काळ आम्हाला उद्ध्वस्त करणारा होता. सरकार ही … Read more

कोरोना निर्बंध तोडणाऱ्यांवर कडक कारवाई ; जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,मनपा आयुक्तांनी रस्त्यावर उतरून केली कारवाई

औरंगाबाद: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता आणि मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी अंशतः लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी स्वतः शहरांमध्ये फिरून कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिक,दुकांदारावर कारवाई केली. जिल्हाधिकारिसह दोन्ही आयुक्त रस्त्यावर उतरल्याने नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले. राज्या पाठोपाठ शहरांमध्ये देखील कोरोना डोकंवर काढतोय, कोरोनाच संकट हे दिवसेंदिवस वाढतच चालल आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच ॲक्शन मोडमध्ये … Read more

औरंगाबादसाठी चिंताजनक बातमी !! कोरोना पॉझिटिव्ह रेट 2 टक्क्यांवरून थेट 17 टक्क्यांवर

औरंगाबाद : शहरात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णचा आलेख वाढत आहे. सद्य स्थितीत कोरोनाचे 3515 रुग्ण दाखल आहेत.पंधरा दिवसात कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2 टक्यावरून आता थेट 17 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे शहराला कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. गेल्या काही दिवसात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत दररोज … Read more

मनपाचा हलगर्जीपणा !! 20 कोटींच्या थकबाकीत तब्बल 8.67 कोटी दंड

auranagabad

औरंगाबाद : मनपाने जायकवाडी उपसा केंद्रात केवळ 30 हजार रुपयांचे पाण्याचे मीटर न बसवल्याने दंड म्हणून 4.15 कोटी रुपये तर नियमित पाणीपट्टी न भरल्याने पालिकेला 2.96 कोटीचे विलंब शुल्क भरावे लागणार आहे. 20 कोटी च्या थकबाकीत 8.67 कोटी रुपये निव्वळ दंडाची रक्कम असल्याचा प्रकार समोर आला आहे. जायकवाडी पाटबंधारे विभाग मनपाला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठ्यासाठी … Read more

पंधरा दिवस भाजी खाल्ली नाही तर कोणी मरणार नाही ; मनपा प्रशासक पांडेय

औरंगाबाद: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने गुरुवारपासून अंशतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जाधववाडीतील भाजी मंडईत मोठी गर्दी जमत असल्याने तिथून संसर्गाचे प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रशासनाने सात दिवस हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोकने व लोकांचे जीव वाचविण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंधरा दिवस कोणी भाजी खाल्ली नाही किंवा विकली … Read more

लॉकडाऊन काळात देखील सुरू राहणार एस.टी ची बससेवा

औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरात आज पासून 4 एप्रील दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच दर शनिवार आणि रविवारी कडक स्वरूपात लॉकडाऊन राहणार आहे. असे असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरूच राहणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आलीय. वाढत्या संसार्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशंत: लाकडाऊन लावण्याचा … Read more

त्रिसदस्यीय समिती गठीत केल्यानंतर तब्बल 28 तासांनंतर शोले स्टाईल आंदोलन मागे

औरंगाबाद | सिल्लोड शहरात पाण्याच्या टाकीवर चढून सुरू असलेले शोले स्टाईल आंदोलन तब्बल अठ्ठावीस तासानंतर दुसऱ्या दिवशी उपविभागीय अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. नगर परिषद सिल्लोडच्या स्वच्छता व पाणीपुरवठा कामगारांच्या विविध मागण्या घेऊन शहरातील टिळक नगर जवळील पाण्याच्या टाकीवर सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. काल दिवसभर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राजकीय दबावामध्ये आंदोलनकर्त्यांना सकारात्मक … Read more

शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more