Big Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला ‘जनता कर्फ्यू’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इथून पुढचा काही काळ आपण सामाजिक अंतर ठेवून वागणच हितकारक आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विज्ञानाला अजूनही ठोस उपाय सापडला नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा वेळ सुजाण भारतीय नागरिक म्हणून मला द्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांनाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना … Read more

सचिन तेंडुलकरने केली करोना व्हायरसची टेस्ट क्रिकेटशी तुलना, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार प्रमाणेच नागरिक सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत. करोनासंबधी जनजागृतीसाठी अनेक सेलिब्रिटी सध्या जनजागृती करताना दिसत आहेत. करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण स्वच्छता आणि दक्षता घेण गरजेचं असल्याची जाणीव भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही लोकांना करुन दिली आहे. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आता … Read more

कौतुकास्पद! करोनाचा धोका लक्षात घेत कोल्हापूरात अवघ्या २० लोकांच्या उपस्थितीत उरकलं लग्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा शेलार आणि गारगोटी इथल्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शेलार कुटूंबियांनी सर्व समाजाला … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय, २२ मार्चपासून परदेशी विमानांच्या लँडिंगवर घातली बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना व्हायरसमुळे मृत्यूची संख्या ४ झाली आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून १७७ झाली आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९ झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात जास्त संख्या परदेश दौरा करून भारतात परतलेल्यांची आहे. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत २२ मार्चपासून परदेशातून भारतात येत असलेल्या सर्व प्रवासी विमानांच्या लँडिंगवर … Read more

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांवरील सवलती बंद केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेत सर्व कॅटेगरीतील रेल्वे तिकिटांवरील सवलती पूर्णपणे बंद केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत, दिव्यांगजनांच्या ४ श्रेणी आणि ११ प्रकारच्या रूग्णांना मिळणाऱ्या रेल्वे तिकिटावरील सवलती कायम … Read more

मिरजेत येत्या १५ दिवसात कोरोना टेस्ट लॅब सुरु होणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणतेही करोनाचे रूग्ण आढळले नाहीत. नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मिरेजतील शासकीय रूग्णालयात करोना रूग्णांसाठी अत्याधुनिक स्वॅप लॅब सुरू होणार आहे. त्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच तो मंजूर होईल. सॅनेटायझर व मास्कचा साठा करून टंचाई निर्माण करणार्‍यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री … Read more

धसका करोनाचा! कोल्हापूरात केवळ शिंकल्यामुळं एकाला बेदम मारहाण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर एकीकडे जीवघेण्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनापासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे करोनाची दहशत लोकांमध्ये पसरली असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरात करोनाच्या धसक्यातून एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काल शहरातील गुजरी गल्लीत बाईक वरुन जाणाऱ्या दोघांमध्ये केवळ अंगावर शिंकल्याच्या कारणावरुन वाद झाला. … Read more

१३० वर्षात प्रथमच मुंबईच्या डब्बेवाल्यांनी १० दिवस सेवा ठेवली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, … Read more

सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे आले धावून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोनाने थैमान घातलं असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये … Read more

राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा ‘अब तक ४७’; आणखी दोघांना संसर्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे करोनाग्रस्तांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. मुंबई आणि उल्हासनगरमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. या करोनाबाधित रुग्णावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून दिली आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. … Read more